ल.पा. कार्यकारी अभियंत्यांच्या चौकशीची मागणी; जि.प.अर्थ -बांधकाम समिती सभापतींचे सीईओंना पत्र

0
नाशिक । जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या पश्चिम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी विकासकामाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता करून कामांचे ठेके दिले. त्यामूळे त्याची चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र अर्थ व बांधकाम समिती सभापतींनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठवले आहे.

लघू पाटबंधारे पश्चिम विभागाच्या कार्यकारी अभियंते चंद्रकांत वाघमारे यांच्या कार्यकक्षेत सुमारे 9 आदिवासी बहूल तालुके आहेत. त्यांच्या कार्यकाळात या भागात विविध लेखाशिर्ष अंतर्गत एकुण किती कामाच्या निविदा प्रक्रिया राबवल्या आणि त्या योग्य पद्धतीने राबवल्या का, असा प्रश्न करून अर्थ व बांधकाम समिती सभापती मनिषा पवार यांनी सीईओ दीपककुमार मिना यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, निविदा प्रक्रिया करताना कार्यकारी अभियंते वाघमारे यांनी कोणत्या अटी-शर्ती टाकल्या होत्या.

त्याचे पालन करून अटीशर्तीचे निविदा प्रक्रिया राबवली का. अपात्र निविदांचे कारणे काय होती. तसेच ज्या ठेकेदारांना कामे दिली गेली. त्यांच्या पात्रता, अटीशर्ती योग्य होत्या का, असा प्रश्न उपस्थित करून पवार यांनी वाघमारे यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणी सीईओंकडे केली आहे. चौकशीकामात हस्तक्षेप होऊ नये म्हणून कार्यकारी अभियंता वाघमारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून द्यावे, अशी सूचना सभापतींनी सीईओना पत्रातून केली आहे.

LEAVE A REPLY

*