Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिक्षण विभागाचे वेतन 24 तारखेला अदा करण्याचे आदेश

Share

संगमनेर (वार्ताहर)- राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन दिवाळीमुळे 24 तारखेपर्यंत करावे अशा प्रकारचे आदेश वित्त विभागाने स्वतंत्र परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व विभागांना दिले होते. तथापि दोन दिवसात या परिपत्रकात बदल करून त्यास स्थगिती देण्यात आली आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाने 11 तारखेला राज्यातील शिक्षण आयुक्तांना आदेश देऊन कर्मचार्‍यांचे वेतन 24 तारखेपूर्वी करण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी होणार किंवा कसे याबाबत संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.

राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी या महिनाअखेर 27 तारखेला दिवाळी येत असल्याने, ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी करावे अशा स्वरूपाची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून राज्याच्या वित्त विभागाने नऊ तारखेला स्वतंत्र परिपत्रक काढून सर्व शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन दिनांक 24 पूर्वी देण्यात यावे अशा प्रकारे आदेशित केले होते. तथापि दोन दिवसातच वित्त विभागाने 24 तारखेला वेतन करण्याच्या परिपत्रकाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन 24 तारखेला होणार नाहीत असे त्यातून सूचित केले आहे.

24 तारखेला वेतन अदा करताना राज्याच्या लेखा कोषागार विभागाच्या संचालकांनी वित्त विभागाला परिपत्रकानंतर पत्र देऊन या विभागातील कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतलेले आहेत. 21 तारखेपर्यंत कर्मचारी निवडणूक प्रक्रिया गुंतले असल्याने राज्याच्या कर्मचार्‍यांचे वेतन 24 पूर्वी करता येणे कठीण असल्याची बाब समोर आली आहे. सर्व कर्मचार्‍यांचे वेतन करण्यासाठी वेतन देयके सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यासाठी पुरेसा कालखंड मिळणार नसल्याने 24 तारखेला वेतन अदा करण्यात लेखा व कोषागारांचा विभागाने असमर्थता दर्शविली आहे.

त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या वित्त विभागाने यापूर्वी 24 तारखेला वेतन करण्याचे आदेश स्थगित केले आहेत. मात्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना स्वतंत्र आदेश देऊन आर्थिक निधी कमी असल्यास देयके उणे स्वरूपात काढण्यात यावी अशी सूचना केली आहे. कोणत्याही परिस्थितीत वेतन ऑफलाइन काढू नयेत. मागील थकबाकी अदा करण्यात येऊ नये. नियमित वेतनच केवळ 24 तारखेपूर्वी काढण्यात यावे अशा स्वरूपाचे निर्णय दिले आहेत.

वित्त विभागाने 11 तारखेला स्थगिती दिली असली तरी शालेय शिक्षण विभागाने 11 तारखेला परिपत्रक काढून, आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षक विभागाच्या कर्मचार्‍यांचे वेतन 24 तारखेला होणार किंवा कसे याबाबत संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहेत.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!