Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

देवळाली : शिवसेनेचे योगेश घोलप पराभूत; सरोज अहिरे यांचा ४१ हजार ७०२ मताधिक्याने विजय

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सर्वात मजबूत मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या देवळाली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे यांनी मुसंडी मारली आहे. सरोज अहिरे यांचा ४१ हजार ७०२ मतांनी विजय झाला. सरोज अहिरे यांच्या विजयामुळे घोलप घराण्याची गेल्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.

ऐनवेळी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणाऱ्या सरोज यांचा या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय झाल्यामुळे जिल्ह्यात या जागेवर चर्चा रंगल्या आहेत.  माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी १९८९ पासून हा मतदारसंघ शिवसेनेसाठी मजबूत करून ठेवला होता.

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी लोकप्रतिंनिधीत्व कायद्यांतर्गत त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक न लढवण्याची नामुष्की आल्यामुळे त्यांनी त्यांचे पुत्र योगेश घोलप यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणले.

सरोज अहिरे यांना अखेरच्या फेरीत जवळपास ४१ हजार ७०२ मतांनी विजय संपादन केला. शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांचा मजबूत बालेकिल्लयास सुरुंग राष्ट्रवादीने लावल्याने शरद पवारांच्या झंझावातात शिवसेनेच्या या जागेला फटका बसलेला दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!