Saturday, April 27, 2024
Homeनगरदेवळाली प्रवरा पालिकेचा 2 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर

देवळाली प्रवरा पालिकेचा 2 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर

देवळाली प्रवरा (वार्ताहर) –

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सन 2021 – 22 या आर्थिक वर्षातील 2 लाख पाच हजार 198 रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर करण्यात

- Advertisement -

आले. यावर्षीच्या अंदाजपत्रकात नगरपालिकेने कोणतीही करवाढ न करता शहरातील नागरिकांना दिलासा दिला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी विकास कामासाठी भरीव तरतूद करण्यात आली. शहरातील सर्व गटारी भूमिगत करण्यासाठी नियोजन तयार केलेले असून पुढील काळात देवळाली प्रवरा शहरात उघड्यावरील गटार दिसणार नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

देवळाली प्रवरा नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. मुख्याधिकारी अजित निकत यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. आरंभी शिल्लक रु. 3, 39, 198 रुपये तर सन 2021-22 या आर्थिक वर्षात अंदाजित जमा होणारी 76 कोटी 09 लाख 67 हजार 198 रुपये जमा होणे गृहीत धरण्यात आली आहे.

मुख्याधिकारी निकत यांनी सांगितले, यावर्षीच्या अर्थसंकल्पात नगरपालिकेने कोणत्याही प्रकारे करवाढ न करता नागरिकांचा हिताचा विचार केला आहे. नागरिकांवर करांचा बोजा पडू नये म्हणून यावर्षी प्रशासनाने करवाढ सुचविलेली असतानाही कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.

नगरपालिकेने सन 2021 -2022 च्या अंदाजपत्रकात खालीलप्रमाणे खर्च धरण्यात आला आहे. आस्थापना खर्च 7 कोटी 4 लाख 75 हजार रुपये, प्रशासकीय खर्च 1 कोटी 39 लाख 37 हजार रुपये, व्याज व वित्त आकार 1 कोटी 5 लाख 15 हजार रुपये, मालमत्ता दुरुस्ती व परीक्षण 86 लाख 31 हजार रुपये, व्यवहार व अंमलबजावणीसाठी 90 लाख 22 हजार रुपये, दिलेली महसुली अनुदाने, अंशदाने आणि अर्थसहाय्य 1 लाख रुपये, संकीर्ण खर्च 15 लाख 40 हजार रुपये, एकूण खर्च 11 कोटी 42 लाख 20 हजार रुपये, स्थिर व जंगम मत्ता 58 कोटी 70 लाख 21 हजार रुपये, गुतवणुकीसाठी 10 लाख, किरकोळ ऋणको साठी 5 कोटी 54 लाख 22 हजार रुपये, शासन अनुदाने, ठेवी 28 लाख रोख आणि बँक शिल्लक 3 लाख अशी एकूण भाडवली खर्च 64 कोटी 65 लाख 42 हजार रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे.

नगरपालिकेने 2021- 2022 या आर्थिक वर्षात विविध विकास कामे व इतर खर्चासाठी पुढीलप्रमाणे अपेक्षित खर्च धरला आहे. ग्रंथ परीगणेसह संगणकीकरण करण्यासाठी 5 लाख रुपये, बुककेस खरेदी ग्रंथासाठी 3 लाख, रस्ते दुरुस्ती 10 लाख, कोव्हीड 19 उपाययोजनासाठी 2 लाख, खासदार निधी 20 लाख, नागरी दलित्तेतर विकास योजना 50 लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजना 3 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजना 4 कोटी, 14 वा वित्त आयोग निधी 4 कोटी 50 लाख, 15 वा वित्त आयोग 5 कोटी, भुयारी गटार योजना 20 कोटी, जलतरण तलाव 50 लाख, रस्ते विकास योजना साठी 50 लाख, विशेष रस्ता अनुदान 3 कोटी, पंतप्रधान आवास योजना 4 कोटी.

अंदाजपत्रकावर बांधकाम समिती सभापती ज्ञानेश्वर वाणी, आरोग्य समिती सभापती सचिन ढुस, महिला व बाल कल्याण समिती सभापती नंदा बनकर, महिला व बाल कल्याण समिती उपसभापती उर्मिला शेटे, नगरसेवक प्रकाश संसारे, आदिनाथ कराळे, बाळासाहेब खुरुद, संजय बर्डे, शैलेंद्र कदम, शिवाजी मुसमाडे, अंजली कदम, सुजाता कदम , कमल सरोदे, केशरबाई खांदे, सुनिता थोरात आदींनी अंदाजपत्रकावर चर्चा केली. यावेळी अंदाजपत्रकाचे वाचन लेखापाल कपिल भावसार, अजय कासार आदींनी केले. सभेचे कामकाज प्रशासन अधिकारी बन्सी वाळके, मुकूंद ढुस यांनी पाहिले.

माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे म्हणाले, आपल्या शहरातील प्रत्येक कुटुंबाचे आपले स्वतःचे हक्काचे पक्के घरे असले पाहिजे. आपल्या नगरपरिषदेच्या या वर्षाच्या अर्थसंकल्पात घरकुल योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचा समावेश आहे. या घरकुल योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी नगरपरिषदेकडे अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेचे वतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या