तांबे वेचण्यासाठी गेलेल्या युवकावर बॉम्बगोळा पडून मृत्यू

0
लहवीत वार्ताहर | वंजारवाडी गावालगत मिलिटरी रेंजमध्ये पितळ तांबे वेचण्यासाठी गेला असतांना वंजारवाडी गावातील शिवाजी संपत जाधव (वय ३०) या युवकावर बॉम्ब गोळा पडून जागीच मृत्यू झाला.

त्याच्या बरोबर आणखी दोन युवक होते पण त्यातून सुदैवाने ते वाचले आहेत. या युवकास रेंजमध्येच पुरण्यात आल्याची माहिती प्रतिनिधीने दिली.

या परिसरात सराव चालू असून कोणीही जाऊ नये याबाबत लष्कराकडून आधीच पूर्वसूचना देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*