Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळाली कॅम्प : बिबट्याच्या दहशतीने नागरिक झाले ‘पहारेकरी’

Share

देवळाली कॅम्प : येथील परिसरात बिबट्याची वाढती दहशत लक्षात घेऊन नागरीकांना दिलासा देणे कामी विद्याविनाय सोसायटीतील युवकांनी रात्रीचा पहारा सुरू केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून देवळाली शहराच्या विवध भागात बिबट्याने दहशत माजवीतना अनेक पाळीव प्राणण्याचा फडश्या पाडला आहे .तर अनेक ठिकाणी थेट घराच्या अंगणात येऊन डरकाळी फोडत नागरीकांना घराबाहेर पडणे मुश्किल केले आहे. नागरी वस्तीसाह बिबट्या लष्करी हद्दीतही मुक्त संचार करीत आहे.

या बाबतचे अनेक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वायरल होत आहे. सोमवारी विद्यविनाय सोसायटीच्या डॉ संजय सोनवणे यांच्या बंगल्या लगत च्या झाडावरून बिबट्याने खाली झेप घेतली. यावेळी सोनवणे परिवारातील मुलांनी आरडाओरडा केला .नागरिकही धावून आल्याने बिबट्याने लगतच्या दाट झाडीत पलायन केले.

ही बाब लक्षात घेऊन सोसायटीतील सुशील चव्हाण, राजेंद्र फल्ले, सुनील जाधव, विजय गोडसे, अमित कांडेकर, अमन सिंग, भोळेशंकर राजबली, रोशन पाटील, शिवम उबाळे, प्रशांत पाटील ,सचिन वाघूळकर,गौरव सिंग आदी युवकांनी हाती काठ्या व बेटरय्या घेत वेळोवेळी फटाके फोडत रात्री दोन पर्यंत जगता पहारा दिला. ही मोहीम सलग तीन दिवस चालणार असून वनविभागाने या ठिकाणी तातडीने पिंजरा बसवून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी सोसायटीतील नागरिकांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!