Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळाली कॅम्प सील; मेडिकल व्यतिरिक्त सगळ्या सेवा बंद

Share
देवळाली कॅम्प सील; मेडिकल व्यतिरिक्त सगळ्या सेवा बंद, deolali camp area seal due to corona positive patients breaking news

देवळाली कॅम्प | वार्ताहर

देवळाली कॅम्प येथे काल अचानक ७ रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापार्श्वभूमीवर रात्रीपासूनच पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून आज केवळ याठिकाणी मेडिकल वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. देवळाली कॅम्प पूर्णपणे सील केल्यानंतर रुग्ण आढळून आलेली ठिकाणांना केंद्रस्थान मानून तीन किमी परिघापर्यंत याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करण्यात आले आहे. याठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने रहिवाशांची तपासणी केली जाणार असल्याचे समजते.

काल देवळाली कॅम्प परिसरातील वेगवेगळ्या भागात एकूण ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिक भयभीत झाले असून कॅन्टोन्मेंट प्रशाशसनाने मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद केले आहेत.

काल रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासन, देवळाली कॅम्प पोलीस यांच्यात पुढील नियोजनाबाबत चर्चा झाली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधिकारी व लष्करी अधिकारी यांचा समावेश होता. रात्री उशिरापर्यंत शिगवे बहुला व इतर ठिकाणी पाहणी करून पोलीस प्रशासनास पुढील आदेश दिले असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!