Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जुन्या पेटेन टॅंकवर बसलेल्या बिबट्याचे फोटो देवळालीचे नाहीच; व्हायरल फोटोंचे गूढ कायम

Share

देवळाली कॅम्प । वार्ताहर

नाशिक जिल्ह्यात बऱ्याच भागात बिबट्याचा अधिवास आहे. त्यामुळे बिबट्याचा संचार, हल्ल्याच्या नियमित बातम्या याठीकाणाहून येत असतात. असेच काही बिबट्याच्या वेगवेगळ्या बाजूचे जुन्या पेटेन टॅंकवर निवांत बसलेल्या बिबट्याचे फोटो सोशल मीडियात देवळाली नजीक असलेल्या खंडोबा टेकडी येथील असल्याचे सांगत व्हायरल झाले होते.

सध्याच्या स्मार्टफोनच्या काळात हे फोटो वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. यावर ‘कुणी कुत्रे पाळत असेल, आम्ही बिबटे पाळतो’, खंडोबा टेकडी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होते, याठिकाणी प्रेमी युगुलांची संख्या अधिक असल्याने बऱ्याच ठिकाणी हे फोटो ‘आता प्रेमी युगुलांनी सावधानता बाळगावी’ या आशयाने पोस्ट झाले. एकूणच काल दिवसभर नेटकरयांनी या गोष्टीचे कुतूहल प्रत्येकाच्या मनात निर्माण केले होते.

मात्र, देवळाली कॅम्प अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सदर फोटो देवळाली येथील नसल्याचे सांगितले. वन अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही त्यामुळे हे फोटो नाशिकमधील नसल्याचे बोलले जात आहे.

जर फोटो नाशिकमधील नाहीत तर ते कुठले असावेत? एवढ्या चांगल्या प्रकारचे फोटो कोणत्या जंगलातील असावेत असा प्रश्नही नेटकरयांना पडला आहे. तर दुसरीकडे हे जुने फोटो असावेत आणि ते कुणीतरी व्हायरल केले असावेत असा अंदाजही नेत्कारी बांधताना दिसून येत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!