देवळा तालुक्यात गावठी दारूभट्ट्या उध्वस्त

0
देवळा (प्रतिनिधी) | देवळा पोलिस ठाण्याच्या हद्दित उमराणा, चिंचवे शिवारातील परसुल धरण व चिंचवे धरण परिसरासह डोंगराळ भागातील अवैध गावठी दारु भट्ट्यांवर धाड टाकून १ लाख १० हजार रुपये किंतीचे दारुचे रसायन नष्ट केले.

देवळा पोलिस निरिक्षक गुलाबराव पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. तालुक्याच्या उमराणे, चिंचवे. शिवारातील चिंचवे धरण, परसुल धरण, पोही नाला, आदि ठिकाणांसह परिसरातील डोंगराळ भागात मोठया प्रमाणात अवैद गावठी दारु तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी छापे मारुन ४० लिटरचे ५५ ड्रम व सुमारे २२०० लिटर  दारुचे  रसायन पूर्णपणे नष्ट केले.

तालुक्यातील यापुढेही हि मोहिम आशिच सुरु राहील असे पोलिस सुत्रांकडुन सांगण्यात आले. या मोहीमेत पोलिस कर्मच्यारी निलेश सावकार. किरण पवार. सचिन भामरे. विजय सोनवणे.साबळे. मल्ले.आदि सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*