Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : परतीच्या पावसाने मक्याच्या कणसांना फुटले कोंब

Share

खामखेडा : देवळा तालुक्यात गेल्या काही दिवसापासुन सततच्या परतीच्या पावसाने थैमान घातले असून हाती आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

तालुक्यातील खामखेडा व परिसरात शेतपिकांचे मोठे नूकसान झाले आहे. खामखेडा येथील शेतकरी शामराव बोरसे यांच्या शेतीमध्ये पावसाचे पाणी साचल्याने काढून ठेवलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटले आहे. मका पिकाचे कणसे काढून कापणी केली होती एक तर लष्करी अळीच्या संकटातून सावरत जनावरांना चारा होऊन औषध व मजुरीचा खर्च निघेल असे वाटत होते.

मात्र सततच्या जोरदार पावसामुळे कापणी केलेल्या मक्याला कोंब येऊन कणसासह चारा पूर्ण निकामी झाल्याने सर्व शेतकरी हवालदिल झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या वातावरणामुळे शेती आणि शेतकरी दोन्ही संकटात सापडले आहेत. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.

परतीच्या पावसाचा सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. या संकटांमुळे शेतकरी होरपळला जात असुन प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांना मधून होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!