Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळा : वस्तीशाळेची कमाल! मंगळावर झळकणार विद्यार्थ्यांची नावे

Share

वैभव पवार । खामखेडा

देवळा तालुक्यातील फांगदर शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या उपक्रमशिलतेमुळे नेहमीच प्रकाशझोतात येत असतात. मग ती टाकावू पासून टिकावू वस्तू बनविणे असो व अनोख्या बांबूच्या ठोकळ्यांची लायब्ररी असो. अलीकडेच या विद्यार्थ्यांनी हवाईसफरदेखील केली. आता याच वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांची नावे थेट नासाच्या माध्यमातून मंगळवार लिहिली जाणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची वस्तीशाळा प्रकाशझोतात आली आहे.

‘नासा’ या अवकाश संशोधन करणार्‍या संस्थेचे ‘मंगळ रोव्हर2020’ हे अंतरिक्षयान ‘लाला ग्रह’म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळावर झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसर्‍या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे.

ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत.

त्याअंतर्गत फांगदरच्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व शाळेचेही नावे या उपक्रमसाठी नोंदवले होते.

त्यांचे ऑनलाईन बोर्डिंग पास नुकतेच प्राप्त झाले आहेत. बोर्डिंग पासचे वाटप शाळेत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन मोरे,दिपक मोरे,सागर पवार,सोनजी पवार,हरी माळी,राजेंद्र गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या ( गझङ ) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या (75 नॅनोमिटर) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत.

इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी, तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या चिमुकल्यानी नावे मंगळावर पाठवण्याची संधी मिळाल्याने आनंद होत असल्याचे संजय गुंजाळ यांनी सांगितले.

रोव्हर 2020 हे यान‘ऍटलस त 541 या रॉकेट च्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै 2020 ते 5 ऑगस्ट2020 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. जे 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासा ही अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणारी संस्था, मंगळग्रह त्या ग्रहावरची नासाची चालू असलेली मोहीम आणि पाठवले जाणारे रोव्हर 2020 हे अवकाशयान यांची माहिती मिळेल.

सुनिता धनगर गटशिक्षण अधिकारी देवळा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!