Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : अज्ञाताने कांदा चाळीत युरिया टाकल्याने १२० क्विंटलची नासाडी

Share

देवळा | वार्ताहर

चाळीत साठवणूक केलेल्या कांद्यावर अज्ञात समाज कंटकाने रासायनिक युरीया टाकल्याने सुमारे साडे पाच लाख रुपयांच्या कांद्याची   नासाडी झाली आहे. भऊर येथील शेतकरी विष्णू बापू आहेर यांच्या कांदा चाळीत ही घटना घडली.

विष्णू आहेर यांनी मागील महिन्यात भाव नसल्याने कांदा चाळीत साठवून ठेवला होता. यातच मागील वर्षी झालेल्या विक्रीतून उत्पादन खर्च देखील निघालेला नसल्याने ते यावेळी एका बाजारभावात कांद्याची विक्री करणार होते. परंतू, अशातच  साठवलेल्या कांद्याच्या चाळीमध्ये रसायनिक युरिया टाकल्याने दुष्काळात तेरावा महिन्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या वर्षी कांद्याला नुकताच चांगला भाव मिळायला सुरुवात झाली होती, मात्र त्यातच अशा प्रकारची घटना तालुक्यात घडल्याने कांदा उत्पादकांकडून अशा समाजकंटकांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत आहेर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळी कांदा साठवणुकीसाठी आपल्या राहत्या घरासमोर कांदा चाळ उभारली आहे. साठवलेला कांदा सडत असल्याचे आहेर यांच्या लक्षात आले. खराब वातावरणामुळे सर्वत्र कांदा खराब होत असल्याने आपलाही कांदा खराब होत असेल असा त्यांचा समज झाला.

खराब कांदा चाळीबाहेर काढण्यास सुरूवात केली असता समाजकंटकाने आपल्या चाळीत कांद्यावर युरिया टाकल्याचे लक्षात आले. १२० क्विंटल कांदा खराब झाल्याने आहेर यांचे आजच्या बाजारभावाने जवळपास साडे पाच लाख रुपयांचे नुकसान आहे. मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करत पाण्याचे काटेकोर नियोजन करून कांदा पिकाचे उत्पादन घेतले होते. कांद्याला समाधानकारक बाजार भाव मिळायला लागताच कुणीतरी अज्ञात व्यक्तीने माझ्या कांदा चाळीत रासायनिक खत युरिया टाकल्याने माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

-विष्णू आहेर, शेतकरी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!