Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : भऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचे पिल्लू जखमी

Share

देवळा : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घोड्याचे पिल्लू जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अधिक माहिती अशी की, भऊर येथील श्रीराम नगर शिवारात कारभारी जाधव हे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. काल रात्री नऊच्या सुमारास कुत्रे भूकंण्याच्या आवाजावरून बाहेर आले असता गोठ्यात बिबट्या निदर्शनास आल्याने त्यांची एकच तारांबळ उडाली. त्यांनी आरडा ओरड करून बिबट्याला मोठ्या हिमतीने पळवून लावले.  परंतु या हल्ल्यात घोड्याचे पिल्लू गंभीर जखमी झाल्याने त्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे या भागात राहणार्‍या नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वनविभागाच्या कर्मचार्री शांताराम आहेर व दादाजी गवळी, भऊर चे पशुवैधकीय अधिकारी परदेशी यांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना शेतात बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आले आहेत.

दरम्यान लवकरात लवकर या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!