Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : तहानलेल्या तालुक्यासह परिसरात जोरदार पाऊस

Share

देवळा : जिल्ह्यातील दुष्काळ भाग असणाऱ्या देवळा तालुक्यात आज दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील पर्जन्यमानापेक्षा खूपच कमी पावसाची नोंद या ठिकाणी झाली असून गेल्या १५ दिवसापासून येथील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान तालुक्यासह अनेक भागात झालेल्या पावसाने तहानलेल्या पिकांना तृप्त केले. याबरोबर तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अधिक होते. परंतु देवळा, सटाणा, बागलाण या परिसरात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा येथील शेतकऱ्यांना होती. तरी गेल्या १५ ते २० दिवसांत पावसाने हजेरीच न लावल्याने पिकांवर परिणाम झाला होता. मात्र शेवटच्या क्षणी का होईना आज वरुणराजाने दया दाखवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

अचानक आलेल्या पावसाने बाजारपट्टीत नागरिकांची धावपळ झाली, तर व्यावसायिक आपली दुकाने सावरण्यासाठी मोठी लगबग करताना दिसून आली. रविवारच्या पावसाने शेतकरी काहीसा सुखावला आहे.

एकीकडे अमेरिकन लष्कर आळीने आपले साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरवल्याने हात तोंडाशी आलेले पिके सांभाळण्यासाठी विविध महागडी औषधे फवारणी करून जागवावी लागत आहेत, दुसरीकडे पावसाच्या कमतरतेमुळे पिकांचे संगोपन करणे यात शेतकऱ्यांनी मोठी कसरत करावी लागत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!