Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : विजेचा शॉक लागून चार जनावरांचा मृत्यू

Share

देवळा । महेश सोनकुळे: (दि. ०८)सायंकाळी सहा वाजे च्या सुमारास देवळा शहरानजीक असलेल्या मळ्यात विज वाहिनीची तार तुटून पडल्याने तीन दुभत्या म्हशी व एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

अधिक माहिती अशी कि, देवळा-खर्डा रस्त्यावरील मनोज राजाराम आहेर यांच्या शेतात म्हशींचा गोठा असून यावेळी गोठ्यावर लोंबकळत असणाऱ्या तारेचा स्पर्श झाल्याने तीन म्हशी व एका गायीचा जागीच मृत्यू झाला असून या मनोज आहेर असे शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभावर उपस्थित नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.

वीजवाहक तार तुटून पडल्यानंतर डी. पी. लवकर ट्रिप न झाल्याने व देवळा – खर्डा रस्त्याच्या मध्यभागी तार पडल्याने हा वीस ते पंचवीस मिनिटे विजेचा थरार चालूच होता. सदर घटनेची आ. डॉ. राहुल आहेर व जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर यांनी पाहणी करून वीज कंपनी अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

या बाबत अधिक माहीती अशी कि, कळवणहुन देवळा शहरासाठी १९६३ मध्ये वीज मंडळाकडून सदरच्या विद्युत तारा टाकला आहेत.
सदर तारा जीर्ण झाल्याने बदलण्यासाठी शेत मालक मनोज आहेर यांच्यासह परिसरातील नागरीक गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत असून देखील विज कंपनी कडुन त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही असा आरोप मनोज आहेर यांनी केला.

दुर्घटनेत सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. जवळपास २५ जणांचे कुटुंब वास्तव्यास असलेल्या आहेर कुटुंबियांचे कुणीही घराबाहेर नसल्याने मोठा अनर्थ टळला तर मनोज आहेर हे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले होते मात्र प्रचंड आवाज झाल्याने त्यांनी गोठ्यातून बाहेर पळ काढला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

वीज वितरण कंपनीकडे याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही तारा न बदल्याने आजची घटना घडली असून स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनी विरुद्ध रोष व्यक्त केला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!