Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : पाण्याचा टँकर उलटल्याने युवकाचा मृत्यू

Share

देवळा : मेशी महालपाटणे येथे रस्त्यावर पिण्याचे पाणी भरण्यासाठी जात असलेला टँकर उलटल्याने युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. सोपान तुळशीराम चव्हाण ( वय ३१) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवार (दि.१३) रोजी पहाटे ६ वाजता पाण्याचा टँकर भरण्यासाठी युवक सोपान तुळशीराम चव्हाण ( वय ३१) मेशीहून महालपाटणे येथे जात असतांना गिरणा उजव्या कालव्याच्या पुलाजवळ टॅकर पलटी झाल्याने टँकर चालक सोपान चव्हाण हा टँकरखाली दाबला गेल्याने जागीच मरण पावला.

या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी व गावातील तरुणांनी तात्काळ जेसीबी बोलवत जेसीबीच्या सहाय्याने टँकर सरळ करत सोपानचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवल्यानंतर दुपारी १२ वाजता मेशी येथे सोपानवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या अपघातानंतर सोपान हा दुष्काळाचा पहिला बळी ठरला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

याबाबत देवळा पोलिस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल झाला असन पढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहाणू धोकरट व विनायक गायकवाड हे करत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!