Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

चांदवडचे मताधिक्य ठरविणार ‘आमदार’

Share

नाशिक । प्रतिनिधी

गत पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघ हा आपल्या हातून गेल्याचे शल्य अजूनही चांदवड तालुक्यातील मतदारांना सलत असून यावेळी ही चूक करायची नाही,अशी भूमिका या मतदार संघाने विशेषत:चांदवड तालुक्यातील मतदारांनी घेतली आहे.

स्थानिक नेतृत्वालाच आता कुठल्याही परिस्थितीत संधी द्यायची असा निर्णय येथील शेतकर्‍यांनी घेतल्याचे चित्र असून प्रांतवादात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल यांचे पारडे सध्या जड आहे.

चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार  आ.डॉ. राहुल आहेर व महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्यातच सरळ लढतीचे चिन्ह सध्या आहे.

मात्र,प्रारंभी तुल्यबळ लढत सध्यातरी चांदवडच्या बाजूने म्हणजेच शिरीष कोतवाल यांच्याच बाजूने पूर्णत: झुकल्याचे चित्र आहे.गत निवडणुकीत चांदवड तालुक्यातून डॉ.आत्माराम कुंभार्डे,शिरीषकुमार कोतवाल हे अनुक्रमे अपक्ष व काँग्रेसचे उमेदवार असल्याने महायुतीचे डॉ.आहेर यांना चांदवड तालुक्यातील अंतर्गत दुफळीचा व एकापेक्षा अधिक उमेदवार असल्याचा फायदा झाला होता.

त्यामुळे ही निवडणूक चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघात मतदारांंची संख्या तुलनेने कमी असलेल्या देवळा तालुक्यातील आहेर यांना विजयी करून गेली. मात्र,यावेळी या निवडणुकीत बदल झाला आहे.गत पाच वर्षांमध्ये चांदवडचा विकास खुंटल्याची भावना चांदवड तालुक्यातील लोक आता उघडपणे बोलून दाखवू लागले आहेत.या वेळची निवडणूक ही प्रांत वादावर जाणार हे अगोदरपासूनच चित्र होते.तेच सध्याचेही चित्र आहे.

यावेळी शिरीषकुमार कोतवाल हे काँग्रेसकडून महाआघाडीचे उमेदवार असून चांदवड तालुक्यातून त्यांना सक्षम असा पर्याय कोणीही नसल्याने चांदवड तालुक्यातील जनतेने आता कोतवाल यांच्या पाठीशी उभे राहण्याचे निश्चित केले आहे.

गत पाच वर्षात देवळा आणि चांदवड असा प्रांतवाद सतत होत राहिला. यामुळे आपला विकास घटल्याची भावना चांदवड तालुक्यातील जनता व शेतकरी यांची झालेली आहे.

त्यामुळे आता बदल निश्चित करायचा,अशी धारणा सर्वांच्याच मनात झाली असून शिरीष कोतवाल यांना याचा निश्चितच लाभ होणार,असे सध्याचे चित्र आहे.गतवेळी देवळा तालुक्यातून एकमेव आणि चांदवड तालुक्यातून अधिक उमेदवार असल्याने चांदवड तालुक्यातील मतविभागणीचा लाभ युतीचे डॉ.आहेर यांना  झाला होता.

यावेळी मात्र भाजपाकडून प्रबळ दावेदार असलेले चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे,उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल(दोघेही चांदवड)तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी आपल्या उमेदवारीच्या तलवारी म्यान केल्याने या डॉ. कुंभार्डे व भूषण कासलीवाल यांच्या मतांचा फायदा आता आपसुकच स्थानिक वाद उफाळून आल्यानंतर कोतवाल यांनाच होणार आहे.

चांदवड तालुक्यातील मतदार संख्या देवला तलुक्याच्या तुलनेने अधिक असल्याने तालुक्यातीलच उमेदवार निवडून येण्याची आघाडीकडून मानले जाणारे गणित व प्रांत वादाचा मुद्दा हा आता यशस्वी ठरणार असेच काहिसे सद्याचे  चित्र आहे.त्यामुळे  आता बदल होणार का याकडे मतदार संघाचे लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!