Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : खासदार भारती पवार यांच्या मध्यस्थीने बीएसएनएलची सेवा सुरळीत

Share

देवळा : खासदार डॉ. भारती पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीने गेल्या आठवडाभरापासून बंद असलेल्या बी.एस.एन.एलच्या सर्व सेवा सुरळीत सुरु झाल्या. येथील भारत संचार निगमच्या मुख्य कार्यालयाचे गेल्या नऊ महिन्यांचे भाडे थकल्याने घर मालक शांताराम आहेर यांनी कार्यालयास कुलूप लावून घेतले होते.

त्यामुळे तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड च्या सर्व ऑनलाईन सेवा तसेच ब्रॉडबँड सेवा बंद पडल्या होत्या. याबाबत खासदार भारती पवार यांना समजल्यानंतर त्यांनी दूरसंचार व्यवस्थापन व कार्यालय असलेल्या घराचे मालक शांताराम आहेर यांच्यात यशस्वी शिष्टाई केल्याने काल सायंकाळी बीएसएनएलची सेवा सुरळीत चालू झाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारत दुरसंचार निगम लिमिटेड (बी.एस.एन.एल) च्या देवळा येथिल मुख्य कार्यालयाचे नऊ महिण्यांचे भाडे थकल्याने आठ दिवसांपूर्वी घर मालक शांताराम आहेर यांनी कार्यालय सिल केले होते. त्यामुळे देवळा शहरासह तालुक्यातील बीएसएनएलच्या सर्व सेवा बंद पडल्या होत्या. याचा फटका तालुक्यातील बँकेच्या सेवांसह शासकीय कार्यालयांना देखील बसला होता.

याबाबतची माहिती खासदार भारती पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी नाशिक येथे आल्यानंतर त्यांनी भारत संचार निगम लिमिटेड चे प्रबंधक व घर मालक शांताराम आहेर यांच्याशी चर्चा करून यशस्वी तोडगा काढला यावेळी दूरसंचार प्रशासनाने दोन दिवसात थकीत भाडे अदा करण्याचे आश्वासन दिल्याने कार्यालय सुरू करण्यात आले त्यानंतर बीएसएनएलच्या सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!