भऊरला योगदिनी वृद्धांचाही सहभाग

0

भऊर (वार्ताहर) ता. २१ : आज आंतरराष्ट्रीय योग दिनी सर्वत्र योग दिन साजरा होत आहे त्याच प्रमाणे देवळा तालुक्यातील भऊर गावी शालेय विद्यार्थ्यांसह गावातील ज्येष्ठ नागरीकांनी योगाचे धडे गिरवले.

श्री. सिध्देश्वर विद्यालय भऊर येथे आज शालेय शिक्षक श्री कोळी यांच्या मार्गदर्शना खाली शाळेतील मुला मुलींनी योगासने करत आरोग्याचा संदेश दिला.

विशेष म्हणजे गावातील वृद्ध व्यक्तींचाही यात समावेश होता. शाळेतील विद्यार्थी वृद्ध व्यक्तींना योग करतांना पाहून अधिक उत्साही झाले.

सदर कार्यक्रमात उपसरपंच सुनिल पवार, ग्रामपंचायत सदस्य कडु पवार, माजी सरपंच कारभारी पवार शाळेचे मुख्याध्यापक बी. के. पवार, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

*