नाशिक शहरात डेंग्यूचा डंख; दोन महिन्यात 200 रुग्णांना लागण

0

नाशिक । शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढतच असून गेल्या सहा दिवसात 54 तर ऑक्टोबरमध्ये 248 अशा 202 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले. ऑक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबरमध्येही डेंग्यूचा प्रकोप कायम असल्याचे दिसून येत आहे. सहा दिवसातच शहरात डेंग्यूचे 114 संशयित तर 54 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र डेंग्यूचा फैलाव रोखण्यास महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचेच यावरून दिसून येते.

महापालिकेच्या वतीने डेंग्यूसंदर्भातील उपाययोजना कागदावरच असल्याचे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यंदा स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यूची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली.

त्यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थाने वाढतच गेली. परिणामी डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. ऑगस्ट महिन्यात डेंग्यू आजाराची साथ शहरात मोठ्या प्रमाणावर पसरली असून तिचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ऑगस्टमध्ये 97 डेंग्यूचे रग्ण सापडले होते.

सप्टेंबर महिन्यात ती संख्या आणखी वाढून 105 वर पोहोचली होती. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक 248 जणांना डेंग्यूची लागण झाली. तर संशयितांचा आकडा 477 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नाशिकसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

LEAVE A REPLY

*