औरंगाबादच्या झाडाला लटकल्या साडेदहा लाखांच्या नोटा

0

औरंगाबादच्या सिडको येथील एका झाडाला आज सकाळी ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटा लटकताना दिसल्या.

कुणा अज्ञात इसमाने हा दडवून ठेवलेला काळा पैसा वैतागून येथे टाकल्याचे सांगितले जात असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सिडको एन – २ परिसरातील एका झाडाला लटकत असल्याचे वृत्त एएनआयने प्रसिद्ध केले. चलनातून बाद झालेल्या असल्याने त्या कुणीही उचलल्या नाहीत.

पोलिसांनी या साडेदहा लाख रुपये मूल्याच्या नोटा जप्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

*