Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

नोटाबंदी, जीएसटीमुळे भारत पिछाडीवर- डॉ. रघुराम राजन

Share
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. तसेच सध्याचा ७ टक्के विकास दर देशांतर्गंत गरजेच्या तुलनेत पुरेसा नाही, असे रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. बर्कले येथील युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे आज शुक्रवारी संबोधित करताना राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीची कारणे स्पष्ट केली.

नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्यापूर्वी २०१२ आणि २०१६ या दरम्यानच्या ४ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढली. त्यानंतर नोटाबंदी आणि जीएसटीचा अर्थव्यवस्थेला धक्का बसला. ज्यावेळी म्हणजेच २०१७ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था तेजीत होती; त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्था घसरली, असे राजन यांनी दुसऱ्या एका व्याख्यानात बोलताना म्हटले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!