कावनई ग्रामसेवकाची बदली करा; ग्रामस्थांची मागणी

0
कावनई (वार्ताहर) | इगतपुरी तालुक्यातील कावनई ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व्हायला हवा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
मात्र ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामसेवकाची बदली करण्याचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक वेळेवर येत नाहीत. शालेय विध्यार्थ्यांना रहिवाशी दाखला, तसेच 14 वीत आयोगाचे रकमेची परस्पर विल्हेवाट लावणे, शाळेची पाच टक्के रक्कम खर्च करण्याची गरज असतांना व 3  टक्के अपंग निधीं परस्पर खर्च करणे कुठल्याही प्रकारचे विकास कामे न करता उडवा उडवीचे उत्तर देऊन ग्रामस्थाची दिशाभूल करणे, शौचालयाची निकृष्ट बांधकाम करुन लाभार्थ्यांची फसवणूक यामुळे विकास थांबला आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर भाजप तालुका उपाध्यक्ष राजाराम सिरसाट, संतोष कवटे, दयाराम भांडकोली, संतोष बोराडे, शरद कवटे, साहेबराव पाटील, रमेश शेलार, कोंबू मुकणे, नंदू पाडेकर, राजाराम शेलार, अंकुश सिरसाट, संदीप सिरसाट, राजू शेख, किरण शेलार, अर्जुन शिद, बबन हबीर, दिगंबर सिरसाट, आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*