निलंबित रेशनिंग दुकानांचे जाहिरनामे काढण्याची मागणी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर व तालुक्यातील निलंबित करण्यात आलेल्या रेशनिंग दुकानांचे जाहिरनामे लवकरात लवकर काढावेत अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाच्याप्रती अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. गिरीश बापट व जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहर व तालुक्यातील 17 रेशनिंग दुकाने आतापर्यंत निलंबित करण्यात आली आहेत. वर्षापूर्वी रेशनिंग दुकानांचा जाहिरनामे काढाण्याबाबत लोकप्रतिनिधींनी अर्ज देऊनही आजपर्यंत शासनाने जाहीरनामे काढलेले नाहीत.
महिला बचतगटांनी परवानगी देण्याऐवजी शासनाने श्रीरामपूर शहर व तालुक्यांत एका दुकानाला पाच ते सात इतके दुकाने जोडलेली आहेत. तरी लवकरात लवकर शासनाने रेशनिंग दुकानांचे जाहिरनामे काढावेत. तसेच गोरगरिबांचा बंद करण्यात आलेला धान्य पुरवठा पूर्ववत करण्यात यावा. निवेदनावर हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे, जिल्हाध्यक्ष मनोहर बागुल यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*