Type to search

Featured नाशिक

सेंट्रल पार्कमधील झाडांच्या मोजणीची मागणी

Share

नवीन नाशिक । प्रतिनिधी

पेलिकन पार्कचे काही दिवसांत सेंट्रल पार्कमध्ये रूपांतर होणार आहे. अशातच सदर पार्कमध्ये असलेली सर्व झाडे जशीच्या तशी ठेवणार असल्याचे तयार करण्यात आलेल्या योजनेत ठरले असले तरी याठिकाणी प्रत्यक्षात असलेल्या झाडांची मोजणी करण्याची मागणी प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून पेलिकन पार्कचा प्रश्न हा प्रलंबित होता त्यामुळे नवीन नाशिक मधील मध्यवर्ती ठिकाणी असलेला सुमारे 17 एकरचा भूखंड हा वापराविना पडून होता. याठिकाणी शेकडो झाडे आहेत त्यापैकी बरीचशी झाडे अज्ञात व्यक्तींनी तोडल्याने सेंट्रल पार्कची निर्मिती होईपर्यंत याठिकाणी किती झाडे शिल्लक राहतील, हा खुप मोठा प्रश्न आहे.

याठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून निलगिरी सारखी अनेक वृक्षांची कत्तल झाली असून याप्रकरणी मनपा उद्यान विभाग अद्यापही अनभिज्ञ आहे. सेंट्रल पार्कच्या निर्मितीसाठी याठिकाणी असलेली सर्व झाडे जशीच्या तशी ठेवण्यात येऊन झाडांच्या नुसार पार्कमध्ये विविध कामे करण्यात येणार आहेत व निसर्गरम्य वातावरणात सदर पार्क तयार होणार आहे.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याचे याठिकाणी आढळून आले आहे. सदर पार्कसाठी आरक्षित जागेत सुमारे 30 ते 40 फुट असलेली वृक्षांची कत्तल झाली असून याप्रकरणी मनपा अनभिज्ञ आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!