निरुपम हटाव, मिलिंद देवरा लाओ; मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे मागणी

0
मुंबई (किशोर आपटे) | मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हटाव मिलिंद देवरा लाओ अशी मागणी केली.

मुंबईतील काही नेत्यांनी आज खर्गे यांची हाॅटेल ताज लँडस् एन्डमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, भाई जगताप आणि गुरुदास कामत गटाच्या अनेक नेत्यांनी ही मागणी केली.

निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करावी अशी मागणीदेखील याप्रसंगी करण्यात आली. संजय निरुपम यांच्या एकला चलो रेच्या भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असून आज धुसपूस बाहेर आली.

तसेच कॉंग्रेसमधील नाराज असलेल्या कामत गटाला पक्षात थांबवण्यासाठी फेरबद्दल होण्याची दाट शक्यता असून निरुपम यांच्या जागी देवरा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*