Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा लाभ नाशिकमध्ये मिळावा; खासदार डॉ. भारती पवार यांची संसदेत मागणी

Share

जानोरी | प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या सी.जी.एच.एस. (CGHS) या योजनेच्या अंतर्गत आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाशिकहून मुंबई किंवा पुण्याला जावे लागते त्यामुळे ह्या योजनेचा लाभ अधिक सुलभरीत्या मिळण्याकरीता सदर दवाखाना नाशिक मध्येच सुरु करण्यात यावे अशी मागणी दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली.

दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी लोकसभेमध्ये मतदार संघासह जिल्ह्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला.

नाशिक जिल्ह्यातील सुमारे 15 ते 20 हजार कर्मचारी केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. जसे मध्यवर्ती सशस्त्र पोलिस दल, भारतीय पोस्ट, भारतीय रेल्वे, इंडिया सिक्युरिटी प्रेस इत्यादिं संदर्भात नाशिक येथे दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी लोकसभेमध्ये मतदार संघासह जिल्ह्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक समस्येबाबत प्रश्न उपस्थित करत नाशिक येथे केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या सी.जी.एच.एस. अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्य दवाखान्याच्या गरजेकडे खा.डॉ.भारती पवार यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले.

सी.जी.एच.एस. अंतर्गत नाशिक येथे दवाखाना नसल्याने केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी पुणे किंवा मुंबई येथे 200 किमीचा प्रवास करून आरोग्य सेवेचा लाभ घेण्याकरिता जावे लागते.

असा सी.जी.एच.एस. दवाखाना जर नाशिक शहरात सुरू करण्यात आला तर तो नाशिक जिल्ह्यातील सर्व केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची गरज भागवेल. यामुळे या योजनेचा फायदा मिळवून घेणे अतिशय सुलभ होवून केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे आणखी लाभदायक ठरेल.

योजना असुनही मुंबई किंवा पुणे हे अंतर जास्त असल्याने बहुतेक कर्मचाऱ्यांना त्याकडे पाठच फिरवावी लागते त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सोयीस्कर होईल अशा सोयीनुसार सी.जी.एच.एस. अंतर्गत दवाखाना नाशिकमध्ये सुरु करण्यात यावा आणि त्याचबरोबर नाशिककरांसाठी सी.जी.एच.एस. अंतर्गत आरोग्य दवाखाना सुरू करण्याकरिता योग्य ती पावले उचलण्याची विनंती खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेत केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!