Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकला करोना टेस्टिंग लॅब तात्काळ सुरू करा

नाशिकला करोना टेस्टिंग लॅब तात्काळ सुरू करा

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाशिक येथे स्वतंत्र करोना टेस्टिंग लॅब सुरू करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. याबाबत जिल्हाध्यक्ष आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून ही मागणी केली आहे.

- Advertisement -

राज्यासह नाशिकमध्ये ही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात दोन करोनाचे दोन पॉझिटिव्ह सापडले असून दररोज हजारो रूग्णांची तपासणी केली जात आहे.

तपासणी केलेल्या रूग्णांचे स्वॅब हे तपासणीसाठी पुणे येथे पाठविले जातात. यात खूप कालावधी जात आहे. धुळे येथे सुरू असलेल्या प्रयोग शाळेत स्वॅब पाठविले असता ते तपासणीविना परत आले. त्यामुळे मोठी हेळसांड झाली.अशा परिस्थितीत नाशिकला स्वतंत्र टेस्टिंग लॅबची गरज आहे.

जिल्हा हा शहर व ग्रामीण परिसर मिळून ४० लाख लोकसंख्येचा असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सुपर -स्पेशालिटी हॉस्पिटल सोबत दोन खाजगी शैक्षणिक संस्थांचे वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत आहेत. या सोबत गृह खात्याच्या अंतर्गत व्हिसेरा टेस्टिंग लॅब देखील आहे. परंतु, अजूनही नाशिक विभागात करोना टेस्टिंग लॅब सुरू नाही.

यासंदर्भात जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याशी संपर्क साधून फोनव्दारे चर्चा केली. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी फोनव्दारे संपर्क साधत लॅब सुरू करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या