व्यापारी संकुलास शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची मागणी

0
संगमनेर (प्रतिनिधी)-शहरात नव्याने साकारत असलेल्या एसटी महामंडळ व्यापारी संकुलास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी केली आहे.  मराठी मनाचे मानबिंदू अखंड हिंदुस्थानाचे हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य विशाल आहे.

महाराष्ट्रातील मराठी माणूस व हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाच्या पाठीशी उभे राहणारे व तळागळातील सर्व जनतेला ते आधारवड ठरले आहेत. संगमनेरात होत असलेल्या एसटी महामंडळाच्या व्यापारी संकुलास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी सर्व संगमनेरकर व शिवसैनिकांची इच्छा आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. तरी परिवहनमंत्री महोदयांनी संगमनेरकरांची व शिवसैनिकांची इच्छा पूर्ण करावी अशी मागणी हिंदूच ग्रुपचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपशहर प्रमुख रवीनद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

*