माजी सैनिकांना राजकीय आरक्षण द्या

0

सरकारकडे पाठपुरावा करण्याचे अण्णा हजारे यांना साकडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांचे प्रश्‍न सुटण्यासाठी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळण्याकरीता शासनाशी पाठपुरावा करण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्यावतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे करण्यात आली. देशभक्तीच्या भावनेने माजी सैनिक राजकारणात येण्यासाठी तयार असल्याने त्यांना आरक्षण मिळण्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली.
राज्यासह देशात माजी सैनिकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर सैनिक मतदार संघ तयार करावा. याद्वारे माजी सैनिकांचे लोकप्रतीनिधी त्यांचे प्रश्‍न समजून ते सहज सोडवू शकतील. प्रत्येक विभागात एक आमदार, महापालिकेत दोन नगरसेवक, जिल्हा परिषदेत किमान एक सदस्य, तालुक्यात एक पंचायत समिती सदस्य व गावात एक ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अण्णा हजारे व राज्य सैनिक बोर्डाचे अधिकारी कर्नल सुहास जतकर यांना देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री व राज्यपाल यांना माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठवण्यात आले आहे.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, सचिव जगन्नाथ जावळे, भाऊसाहेब करपे, निवृत्ती भाबड, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर, सचिन दहीफळे, सैनिक बँकेचे माजी चेअरमन काशीनाथ कळमकर, माजी सैनिक संघटना पारनेर तालुकाध्यक्ष सहदेव घनवट, माजी कर्नल साहेबराव शेळके, विश्‍वनाथ कळमकर, रामदास बागडे, माजी सैनिक महिला बचत गटाच्या आशाताई साठे, शेख मेजर, गोपीनाथ डोंगरे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*