Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

पाणीपुरी विकणाऱ्या यशस्वी जयस्वालची डबल सेंचुरी; ठरला सर्वात तरुण खेळाडू

Share

नवी दिल्ली : अलूर येथे मुंबई आणि झारखंड यांच्यात विजय हजारे ट्रॉफीचा लीग सामना खेळला जात आहे. या लीग सामन्यात मुंबई संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने दुहेरी शतक झळकावले आहे. झारखंडच्या संघाविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना यशस्वा जयस्वालच्या फलंदाजीने या वनडे सामन्यात दुहेरी शतक झळकावले.

सतरा वर्षीय यशस्वी जयसवालने १५४ बॉलमध्ये १७ चौकार, १२ षटकार मारत १३१. ८२ च्या स्ट्राईक रेटने २०३ धावा काढल्या. यशस्वी जयस्वाल लिस्ट ए क्रिकेटमध्ये वयाच्या १७ व्या वर्षी दुहेरी शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण प्रथम क्रिकेटपटू ठरला. या स्पर्धेतील कोणत्याही फलंदाजाचे हे दुसरे दुहेरी शतक आहे. याआधी संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक झळकावले आहे.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतासाठी दुहेरी शतक ठोकणारा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल सहावा खेळाडू ठरला आहे. जयस्वाल च्याआधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, करणवीर कौशल आणि संजू सॅमसन या फलंदाजांनी हे पराक्रम केले आहेत. विशेष म्हणजे यशस्वी जयस्वाल मुंबईत गोलगप्पा विकत असत, तरीही त्याने आपल्या प्रतिभेला मरण येऊ दिला नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!