Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

‘तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर आहोत’ : खासदार संजय राऊत

Share

दिल्ली : ‘तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर आहोत’ तसेच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आमचे हेडमास्टर होते असा खोचक असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान लोकसभा सभागृहानंतर राज्यसभा सभागृहात नागरिकत्व दुरुस्थी विधेयकावर ते बोलत होते. राज्यसभेत यावर जोरदार खडाजंगी चालू असून यावेळी संजय राऊत यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले कि, आम्ही असे ऐकले आहे की, जे लोक या विधेयकाला विरोध करतात ते देशद्रोही आहेत किंवा पाकिस्तानी आहेत. जे या विधेयकाचे समर्थन करतात दे देशभक्त आहेत.

आम्ही स्पष्ट करतो की, शिवसेनेला कोणी देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. तसेच देशभरातून या विधेयकास विरोध होत असून यामुळे अनेक ठिकाणी हिंसाचार होत आहे. हे सर्व लोक देशाचे नागरिक आहेत. देशाचे विरोधक नाहीत. त्यामुळे कोणी कोणाला देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी यावेळी जोरदार कानउघाडणी केली.

लोकसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर आता राज्यसभेत यावर चर्चा चालू आहे. विविध राजकीय पक्ष विधेयकाच्या बाजूने आणि विधेयकाच्या विरोधात मत प्रदर्शन करत आहे. दरम्यान, शिवसेना या विधेयकाच्या बाजूने आहे की, विरोधात हे मात्र राऊत यांनी स्पष्ट केले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!