जंतर मंतरवर कोणत्याही आंदोलनला परवानी देऊ नये; राष्ट्रीय हरित लवादाचे दिल्ली सरकारला आदेश

0

राष्ट्रीय हरित लवादाने यापुढे दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी कोणतीही राजकीय, सामाजिक आंदोलने, मोर्चे व घोषणाबाजीला परवानी देऊ नये, असे आदेश दिल्ली सरकारला दिले आहेत.

न्या. आर. एस. राठोड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज हा निर्णय घेतला. आता अशा प्रकारची आंदोलने दिल्लीच्या रामलीला मैदानावरच होऊ शकतील.

आतापर्यंत सर्व प्रमुख आंदोलनांचे जंतर मंतर हेच ठिकाण होते. मात्र तिथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले व्यासपीठ, ध्वनिवर्धक यंत्रणा ताबडतोब हटवा, असेही आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकार, नवी दिल्ली महापालिका आणि दिल्ली पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.

 

LEAVE A REPLY

*