दिल्ली : एटीएममधून बाहेर आली दोन हजारांची अर्धी नोट!

0

दिल्लीतील एका एटीएममधून दोन हजार रुपयाची अर्धी नोट बाहेर आली.

दिल्लीतील जामिया परिसरात राहणाऱ्या शादाब चौधरी डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. त्याने ज्यावेळी पैसे काढले तेव्हा त्याला एक विचित्र प्रकाराची दोन हजार रुपयांची नोट मिळाली. ही नोट अर्धीच छापलेली होती तर तिचा अर्धा भाग कोरा कागद होता.

शादाबने या प्रकरणाची बँक तसेच स्थानिक पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शादाबने एटीएममधून दहा हजार रुपये काढले. ज्यामध्ये दोन हजार, 500 आणि 100 च्या नोटांचा समावेश होता.

मात्र त्याने नोटा मोजल्या त्यावेळी त्याला ही कागद जोडलेली नोट आढळून आली. त्याने लगेचच बँककडे या संबंधात तक्रार केली.

बँकेने नोटा न तपासताच एटीएममध्ये टाकल्या का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

LEAVE A REPLY

*