धक्कादायक! स्वस्त कांदा खरेदीसाठी रांगेत उभ्या असणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

धक्कादायक! स्वस्त कांदा खरेदीसाठी रांगेत उभ्या असणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

दिल्ली : सध्या कांद्यावरून रणकंदन सुरु असतांना स्वस्त दरात कांदे घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे.

दरम्यान देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडले असून यामुळे किरकोळ बाजारात देखील कांद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशातच तामिळनाडूमधील एका मोबाइल शॉपवर भन्नाट ऑफर आणली होती. या ऑफरमध्ये मोबाईल फोन खरेदी केल्यास एक किलो कांदा फ्री अशी सवलत होती. यावेळी या ऑफरचा फायदा घेण्यासाठी अनेकजण रांगेत होते. यामध्ये रांगेत उभे असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

ही ऑफर आंध्र प्रदेश येथील राज्य मार्केटिंग विभागांतर्गत देण्यात आली होती. या ठिकाणी कांदा थेट शेतकऱ्याकडून खरेदी करून तो ग्राहकांमध्ये विकला जात होता. यामध्ये बाजारात १०० ते १८० प्रतिकिलो मिळणार कांदा या याठिकाणी २५ रुपये दराने मिळत होता. त्यामुळे अनेकजण या ऑफरचा फायदा घेण्यासाठी या दुकानावर उभे होते.

यामध्ये ६० वर्षीय साम्भाय रेड्डीदेखील आले होते. मात्र दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर ते अचानक जमिनीवर पडले. लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com