‘पंचवटी’ला उशीर; ट्विटर तक्रारीची दखल घेत कर्मचारी निलंबित

0
नाशिकरोड ।  पंचवटी एक्स्प्रेसला उशीर होण्याच्या कारणास्तव प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने एका रेल्वे कर्मचार्‍यास निलंबित करण्यात आल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी दिली.

दि. 29 जुलै रोजी दुरान्तो एक्स्प्रेस उशीराने धावत असल्याने तिला पुढे काढण्यासाठी पंचवटी एक्सप्रेस मनमाड स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती.

6 वाजून 2 मिनिटांनी सुटणारी ही एक्स्प्रेस 6.25 ला म्हणजे 23 मिनिटे उशीराने सोडण्यात आली. त्यामुळे पुढील स्टेशनवरील तिच्या नियोजित वेळा बदलल्या.

मुंबईत ही एक्स्प्रेस 20 मिनिटे उशीरा पोहोचल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांची मोठी अडचण झाली. याबाबत प्रवाशांनी रेल्वेच्या सीओएमएस तसेच ट्विटरद्वारे तक्रार केली.

याबाबत रेल्वे प्रशासनाकडून संबंधितांना उत्तर प्राप्त झाले. त्यानुसार या घटनेला जबाबदार असणार्‍या रेल्वे कर्मचार्‍याला निलंबित करत प्रवाशांच्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त केली.

ट्विटरवरून केलेल्या तक्रारीची दखल घेत कर्मचार्‍याचे निलंबन होणे ही घटना प्रथमच घडली आहे.

LEAVE A REPLY

*