Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

प्रेरणादायी रविवार : भारतीय सेनेत अधिकारी झालेल्या ‘या’ ट्विन्सची कहाणी

Share

डेहराडून : प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी वेगळी घटना घडत असते. किंवा वेगळी गोष्ट असते. अशीच एक घटना जालंधर येथील जुळे भाऊ असणाऱ्या अभिनव आणि परिनव या दोघांची. जालंधर येथील जुळे भाऊ असलेल्या अभिनव आणि परिनव हे दोघे प्रथमच भारतीय सेनेत अधिकारी झाले असून त्यांनी भारतीय सैन्य अकादमीतुन पास होत इतिहास रचला आहे.

भारतीय सेनेच्या अकादमीचा निकाल शनिवारी (दि. ०८) रोजी लागला. यंदाच्या पसासिंग आउट परेड मध्ये या दोघं भावांनी एकाच बॅच मधून पास होण्याचा बहुमान मिळवला असून त्यासोबत भारतीय सेनेत अधिकारी म्हणून देखील पहिल्यादांच जुळे भाऊ आपली जबाबदारी पार पाडणार आहे. या दोन जुळ्या भावांची गोष्ट केवळ परिवारासाठी आनंदायी नसून देशातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

जालंधर मध्ये राहणाऱ्या अशोक पाठक आणि मंजू पाठक यांची हि दोन्ही मुले आहेत. यातील परिणव सांगतो कि आज आम्ही त्या उंचीवर पोहचलो आहोत ज्या ठिकाणी आम्ही तसेच कुटुंबीयांनी जाण्याचे स्वप्न बघितले होते.

या दोघांनीही अमृतसर येथील बारावी पास केली आहे. दहावी आणि बारावीमध्ये दोघांनाही ९० च्या आसपास मार्क होते. त्यानंतर त्यांनी बीटेक ला प्रवेश घेत चांगल्या मार्कांनी पास झाले. त्यानंतर ते भारतीय सेनेत दाखल झाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!