Type to search

Breaking News देश विदेश

अरकोट : पूरग्रस्तांना मदत घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले; तीन जण बेपत्ता

Share

डेहराडून : उत्तरकाशीतील अरकोट येथे पूरग्रस्तांना मदत पुरवून परतणारे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार (दि. १७)ऑगस्ट रोजी रात्री ढगफुटीनंतर उत्तरकाशीच्या अराकोट गावात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी मदत पुरवण्याचे काम चालू होते. दरम्यान हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अरकोटमध्ये मदत साहित्याचे वितरण करून परतत असताना हि घटना घडली. हेलिकॉप्टर समोर असणाऱ्या विजेच्या तारांमध्ये अडकल्याने खाली कोसळले. परिणामी यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे हेलिकॉप्टर हेरिटेज कंपनीचे असून मोल्डी येथे ते क्रॅश झाले. दुर्घटनास्थळी बचाव कार्यासाठी एक हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!