अॅसिड हल्ला पीडितेवरील ‘छपाक’ चित्रपटातला दीपिकाचा फर्स्ट लूक

0
मुंबई : दीपिकाने सोशल मीडियावर तिच्या ‘छपाक’ या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे. ऍसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.

दीपिका यात मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिने या चित्रपटाचा प्रस्ताव स्वीकारला त्या दिवसापासूनच एका अद्वितीय कलाकृतीचा नमुना पाहायला मिळणार अशा चर्चांना उधाण आलं. किंबहुना प्रेक्षकांचा याविषयीची हमीच होती. हा फर्स्ट लूक पाहता हीच बाब अनेक अंशी सिद्ध होत आहे.

चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून 10 जानेवारी 2020 रोजी ‘छपाक’ प्रदर्शित होईल. फॉक्स स्टार स्टुडिओ, दीपिका पदुकोणचा ‘के ए एन्टरटेनमेंट’, मेघना गुलजारच्या ‘मृगा फिल्म्स’नी या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘छपाक’ चित्रपटाद्वारे दीपिका पदुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे.

LEAVE A REPLY

*