Type to search

Featured हिट-चाट

दीपिकाचा तोच खरा मित्र

Share

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा नवरा रणवीर सिंग हे इंडस्ट्रीतलं सगळ्यांत हॉट अँड हॅपनिंग कपल. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. दीपिकानं त्यांचं नातं हे मैत्रीचं असल्याचं स्पष्ट केलं. ती म्हणाली, ङ्गरणवीर हा माझा खरा मित्र आहे. माझं करिअर आणि मी मिळवलेल्या यशाचं श्रेय हे त्याचं आहे. जेव्हा मी तणावग्रस्त होते, तेव्हा मला त्याने सतत आधार द्यायचं काम केलं आहे. या इंडस्ट्रीत त्याच्या पाठिंब्याशिवाय मी स्वतःचा विचारही करू शकत नाही.फ तिच्या या मुलाखतीपूर्वीच कुटुंबविस्ताराचा निर्णय हा सर्वस्वी दीपिकाचाच असेल, असं रणवीरनं सांगितलं होतं. त्यामुळे या दोघांची घट्ट मैत्री चाहत्यांसाठी नेहमीच कौतुकाचा विषय राहिली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!