Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात घसरण

नाशिक बाजार समितीत पालेभाज्यांच्या दरात घसरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

परतीचा पाऊस रवाना झाल्यानंतर आता कोरडे हवामान निर्माण झाले असुन काही दिवसापुर्वी घसरलेला पारा पुन्हा वर आला आहे. परिणामी जिल्ह्यात पालेभाज्या- इतर भाजीपाल्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

यामुळेच नाशिक मार्केेट कमेटीत पालेभाज्यासह इतर भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी गेल्या आठवड्यापेक्षा शनिवार च्या पालेभाज्यास मोठी घसरण झाली असुन आज (दि.22) कमेटीत कांदा पात, मेथी, वांगे, ढोबळी मिरची, हिरवी मिरची यांना सर्वाधिक भाव मिळाला. शनिवारी कमेटीतून राज्यात व परराज्यात 168 भाजीपाल्याचे वाहने रवाना झाली.

जिल्ह्यातील मागील आठ दहा दिवसापुर्वी पारा 10 ते 11 अंशापर्यत खाली घसरल्यानंतर आता पुन्हा 17 अंशावर आला आहे. या बदलेल्या वातावरणामुळे गेल्या नाशिक मार्केट कमेटीत भाजीपाल्याची आवक वाढत चालली आहे. शनिवारी 13 हजार 16 क्विंटल इतकी भाजीपाल्याची आवक झाली. तसेच पाल्याभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शनिवारी गावंठी कोथंबिरीला (प्रति 100 जुडी) 750 रु., हायब्रीड कोथंबिरीला 400 रु., शेपू 1000 रु., पालक 200 रु., कांदापात 2000 रु. पुदिना 100 रु. मुळा 10 रु. असा भाव मिळाला.

शनिवारी (दि.21) रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत वांगी प्रति क्विंटल 2 हजार 650 रु. व ढोबळी मिरची(आवक 213 क्विंटल)ला सर्वाधिक असा 2 हजार 500 रुपये असा भाव मिळाला. त्यानंतर गवारला 2 हजार रु.(आवक 6 क्विंटल) इतका भाव मिळाला आहे. तसेच दोडका1460 रु(एकुण आवक 136 क्विंटल), गिलके 1325 रु.(एकुण आवक 110 क्विंटल), भोपळा 535 रु.(एकुण आवक 1393 क्विंटल), टमाटा 1125 रु.(एकुण आवक 1140 क्विंटल) असा भाव मिळाला.

तर फ्लॉवर 500 रु.(एकुण आवक 579 क्विंटल), कोबी 1250 रु.(एकुण आवक 573 क्विंटल), काकडी 750 रु.(एकुण आवक 1615 क्विंटल), भेंडी 1290 रु. (आवक 47 क्विंंटल) असा भाव मिळाला. तसेच समितीत 21 नोव्हेंबरला कांद्याला प्रति क्विंंटल 4000 रु.(आवक 250 क्विंटल), बटाटा 3200 रु.(आवक 680 क्विंटल) आणि लसुन 9500 रु. (आवक 27 क्विंटल) असा भाव मिळाला. नाशिक मार्केट कमेटीतून मंगळवारी मुंबई उपनगरे करिता 145, जळगांव 3, नागपूर 5, मध्यप्रदेश 10, पुणे 2, औरंगाबाद 3 अशी 168 भाजीपाल्याची वाहने रवाना झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या