कर्जमाफीसाठी ऑक्टोबरपर्यंत थांबणे म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण’- खा. संजय राऊत

0
नंदूरबार : कालपर्यत शेतकऱ्याच्या प्रश्नावर काँग्रेसला शिव्या घालत होतो, पण तीन वर्षापूर्वी वाजत गाजत सत्तेवर बसवले ते चोर निघालेत.

आता त्याच्याकडून हिशोब मागत आहे, म्हणून त्यांच्या जिव्हारी लागत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीतील सर्व चोर आता कोणत्या पक्षात आहे विचारा. यांनी वाल्याचे वाल्मिकी करण्याचे मशीन आणले आहे का? अशा प्रश्न उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

नंदूरबारात शिवसेनेतर्फे शेतकरी कर्जमुक्ती मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खा. राऊत संवाद साधत होते.

यावेळी ते म्हणाले,  मोदींचे वापरलेले कोट विकले तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. कर्ज माफीसाठी ऑक्टोबर पर्यत थांबण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा म्हणजे लबाडच्या घरचे जेवण अशी गत आहे. असेही खासदार संजय राऊत यांनी म्हणत पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली.

अल्पभूधारक नाही तर सर्व शेतकऱ्याची कर्ज माफी करण्याची मागणी यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केली.

LEAVE A REPLY

*