कर्जमाफी निर्णय योग्य, पण समाधानकारक नाही – उद्धव ठाकरे

0
निफाड | संपूर्ण कर्जमाफी ही शिवसेनेची मागणी होती. ती कशी करू घ्यावयाची ते आम्हाला माहिती आहे. कर्जमाफीचा फायदा येथील शेतकऱ्याला झाला नाही म्हणून आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड येवला दौऱ्यावर आलो असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

कर्जमाफीचा निर्णय एेतिहासिक आहे पण समाधान करणारा नाही. शिवसेनेच्या रेट्यामुळे कर्जमाफी मिळाली तुमच्या मागण्या मला समजतात, पण त्या मुख्यमंत्र्याला समजत नाहीत असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला.

आज उद्धव ठाकरे निफाड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी परीवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, नगरविकास राज्यमंत्री दादाजी भुसे निफाडचे आमदार अनिल कदम यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*