नाशिक जिल्हा बँकेकडून 78 कोटी खरिपासाठी कर्जवाटप!

0
नाशिक । जिल्हा बँकेेने खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना 78 कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आहे. गतवर्षाच्या तुनलेत ही रकम अत्यल्प आहे. वसूली नसल्याने आणि शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्याने जिल्हा बँकेच्या वसुलीत भर पडलेली नसल्याने जिल्हा बँकेने चालु खरीप हंगामात 78 कोटी रुपये वसूल करून तेवढेच पैसे पीककर्जासाठी वाटप केले आहे.
खरीप हंगामा सध्या पेरण्यांच्या टप्प्यात आह. शासनाने खरीप हंगामासाठी 10 हजार रुपये शेतकर्‍यांना देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एवढ्या रकमेत शेतकर्‍यांना किंचीतही खरीप हंगामाचे कामे करता येत नव्हते. त्यामूळे शासनाने पीककर्ज द्यावे, अशी मागणी करीत शेतकर्‍यांनी कर्जमाफी मागणीच्या अगोदर जिल्हा बँकेकडे पीककर्जासाठी अर्ज दिलेले होते. त्यामूळे ज्या शेतकर्‍यांनी पीककर्जासाठी अर्ज दिलेले होते. त्या शेतकर्‍यांना बँकेने खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप केले.
जिल्हा बँकेने चलनबंदी काळात स्विकारलेल्या 341 कोटी रुपयांच्या रकमा आतापर्यंत मुख्यालयाच्या तिजोरीत पडून होत्या. या रकमेचे चलन बदलून देण्यासाठी कालच रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटा मागवून घेतल्या आहेत. त्यामूळे या रकमेपोटी मिळणारी 319 कोटी रकम जिल्हा बँकेच्या खेळत्या भांडवलात भर घालणार आहे. त्यामूळे आगामी काळात जिल्हा बँकेची आर्थिक पत सुधारणार आहे. मात्र शेतकर्‍यांना जेव्हा शासन कर्जमाफीपोटी रकम देणार आहे, त्यामुळे जिल्हा बँकेच्या तिजोरी अजून भर पडणार आहे.
ज्या शेतकर्‍यांनी दिर्घमुदतीचे कर्ज घेतलेले आहे. पण ते थकीत झालेले आहे, अशा शेतकर्‍यांना जिल्हा बँकेने पुर्वीच वसूलीच्या नोटीस दिलेल्या आहेत. मात्र, शासनाचे कर्जमाफी निर्णयाचे निकष दररोज बदलत असल्याने जिल्हा बँकेला त्यानुसार शेतकर्‍यांची वर्गवारी आणि माहिती पूरवण्याचे काम करावे लागत आहे.

LEAVE A REPLY

*