वांगदरी येथील विवाहितेचा होरपळून मृत्यू

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वांगदरी (ढोकराई) येथील वैशाली विकास नागवडे (वय 27) या विवाहितेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. याबत पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान मुलीच्या वडिलांनी सासरच्या लोकांविरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत.
वैशाली नागवडे हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथे आणण्यात आला होता. परंतु तेथे शवविच्छेदन न करता तो पुण्याला पाठविला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत.

LEAVE A REPLY

*