संत बाळू मामा सेवेकर्‍याचा शेततळ्यात पडून मृत्यू; चांदवड तालुक्यातील घटना

0
खडकजांब (मोहन कांबळे):- चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे गेल्या काही दिवसांपासून आदमपूर येथील संत बाळू मामा यांच्या पालखीचा मुक्काम असून यात सहभागी झालेल्या सेवेकरी मुलाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना (दि. ११) ला रात्री उशिरा उघडकीस आली.
चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे गेल्या काही दिवसांपासून आदमपूर येथील संत बाळू मामा यांच्या पालखीचा मुक्काम असून बाळू मामांच्या सेवेसाठी पालखीत सहभागी झालेला उमेश भिला गरदरे (१८) या तरुणाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला.
खडक ओझर परिसरात राहणारे शेतकरी निवृत्ती पगार यांच्या शेततळ्यात मृतदेह आढळून आला त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधला.
पोलीस निरीक्षक नितीन पाटील, कैलास इंद्रेकर, अनिल गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने पगार यांच्या शेततळ्यात पडलेला उमेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

*