पुत्र वियोगाने मातेचा मृत्यू

0

सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या भावाचे गेल्या काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. येत्या मंगळवारी पोपटराव कोकाटे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता.

त्याआधीच पुत्र वियोगामुळे मा. आ. कोकाटे यांच्या मातोश्री  सरस्वती शिवाजीराव कोकाटे यांचे आज (दि. 21) सकाळी 9.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

भावाचा दशक्रिया विधी होण्याआधीच आईचेही निधन झाल्याने कोकाटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दुपारी 4 वाजता मातोश्री सरस्वतीबाई यांच्यावर सोमठाणे (ता. सिन्नर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*