अहमदनगर : चिचोंडी पाटील येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

0

चिचोंडी पाटील येथील घटना, 5 मित्र पसार

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे एका तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. हा मृत्यू संशयास्पद असून तरुणासोबत बसलेले पाच तरुण पसार झाले आहेत. त्यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडे जात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
संदीप गजानन गायकवाड (वय 27, रा. चिचोेंडी पाटील, हल्ली, सुपा. ता. पारनेर) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तात्पुरती अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदीप हा चिचोंडी पाटील येथील रहिवासी असून गेल्या सहा वर्षांपासून पारनेर तालुक्यातील सुपा येथे राहत होता. मात्र मित्रांना भेटण्यासाठी तो आठ दिवसांतून गावी येत असे. रविवारी (दि.26) तो मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बसला होता. त्यांच्या पार्टीचा पराक्रम स्थानिक नागरिकांनी पाहिला होता.
मात्र सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या पाच मित्रांमध्ये गायकवाड दिसून आला नाही. सोमवारी (दि.27) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास चिचोंडी पाटील परिसरात पोपट गजानन कोकाटे यांच्या विहिरीत एक मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलीस पाटील निलकंठ खराडे यांना मिळाली. त्यांनी याबाबत सहायक पोलीस निरीक्षक परदेशी यांना दिली.
त्याला बाहेर काढले असता चेहर्‍याला, डोळ्याला काही जखमा होत्या. त्यामुळे या जखमी जलचर प्राण्यांमुळे झाला आहे. की, मारहाणीमुळे हे स्पष्ट झाले नाही. हा घातपात आहे की, अपघाती मृत्यू याबाबत शंका निर्माण केली जात आहे. मात्र, गायकवाड सोबत असणारे पाच मित्र पसार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
रात्री उशिरा पोलीस या तरुणांचा शोध घेत होते. मात्र ते घरी मिळून आले नाही. त्यांचे मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या घटनेत आज गायकवाडच्या पालकांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*