Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

पुणे : कर्णबधिरांना पोलिसांची अमानुष मारहाण – राज ठाकरे

Share
पुणे : पुण्यात मूकबधिर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. या मुलांला सरकारला शाप लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.

आंदोलनकर्त्या तरुणांच्या मागण्या शिक्षणासंबधीच्या आहेत, चुकीच्या नाहीत. शिक्षण घेण्यासाठी सांकेतिक भाषेत शिकवणारे शिक्षक त्यांना हवे आहेत, अशा त्यांच्या काही मागण्या आहेत. या तरुणांच्या मागण्या लवकरच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं.

विद्यार्थी आंदोलनावर ठाम
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यानंतर आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलनांचा पवित्रा कायम ठेवला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण
पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण-तरुणी पुण्यात आले होते. आंदोलनानंतर मंत्र्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा कर्णबधिरांच्या संघटनेकडून देण्यात आला. दरम्यान, मंत्र्यालयावर मोर्चा काढण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार्‍या कर्णबधिरांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…
कर्णबधिरांच्या आंदोलनात झालेल्या लाठीमाराचे राज्यभरात राजकीय पडसाद उमटले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी धरणे आंदोलन करणाऱ्या कर्णबधिरांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या प्रकाराचा राजकीय वर्तुळातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. आंदोलक नव्हे, तर हे सरकारच मूकबधिर असून, गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!