17 नंबर फॉर्म भरण्यास 21 ऑगस्टपर्यंत मुदत

0
नाशिक | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या फॉर्म न 17 भरून परीक्षेस प्रविष्ठ होणची सुविधा परिक्षा मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये होणारया उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा व माध्यमिक शालान्त परिक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणारया विद्यार्थ्याासाठी यंदापासून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.

हे सर्व अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावे लागणार आहेत. 31 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून 1 ते 23 ऑगस्ट या कालावधीत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमुद करण्यात आलेल्या पत्यावर जमा करावीत संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्राप्त सर्व अर्ज व शुल्कासह 28 ऑगस्ट रोजी सबंधित विभागीय मंडळात जमा करावी.

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकाराचा फोटो, कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत तसेच आर्जाची प्रत ती नूमत केलेल्या ई मेलवर प्राप्त करून घ्यावी.

यासाठी विहीत शुक्ल लागणार आहे. सर्व प्रक्रिया ऑनलार्इान् होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशही ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांची रितसर संबंधित महाविद्यालयात प्रवेश दिले जाणार आहेत अशी माहिती विभागीय मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*